By  
on  

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर याचं निधन ; कपूर कुटुंबावर शोककळा

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर याचं निधन झालं आहे.कृष्णा कपूर 88 वर्षांच्या होत्या. रणधीर कपूर, ऋतू कपूर नंदा, ऋषि कपूर, रीमा कपूर जैन आणि राजीव कपूर ही त्यांची मुलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कपूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कृष्णा राज कपूर या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळतेय. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा राज कपूर यांना कपूर कुटुंबाचा आधारस्तंभ मानलं जायचं. राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं होतं.

कपूर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आता हळहळू त्यांचे नातेवाईक आणि सेलिब्रिटींची वर्दळ त्यांच्या निवासस्थानी सुरु झाली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावरुन कृष्णा राज कपूर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive