By  
on  

माधुरी दीक्षितचा वेब डेब्यु असलेल्या सिरीजचा टीजर रिलीज

सिनेमा, रिअ‍ॅलिटी शो नंतर माधुरी आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सज्ज झाली आहे. ‘फाईंडिंग अनामिका’ या सिरीजमधून माधुरी वेबपदार्पण करते आहे. टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधुरीने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या टीझरमध्ये माधुरी एका गाडीतून उतरताना दिसते आणि तिचे चाहते तिची प्रतिक्षा करत असल्याचे पाहायला मिळते. 

 

 

तेवढ्यात बॅकग्राऊंडला एका माणसाचा आवाज येतो, तो विचारतो, “तर मला सांगा, अनामिका आनंद असणं कसं वाटतं? यावर माधुरी म्हणते, ‘बरं वाटतं, खरं सांगू, इतक्या वर्षांनंतरही हे माझं आयुष्य आहे हे खरं वाटतं नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते. कोणाचीही नजर लागायला नको.’
ही गोष्ट एका सुपरस्टारची आहे जी एक दिवस अचानक गायब होते. या चित्रपटाची कथी ही श्री राव आणि निशा मेहता यांनी लिहिली आहे. माधुरी व्यतिरिक्त संजय कपूर, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी आणि मानव कौल हे कलाकार दिसणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive