तीन रुपयांसाठी 24 तास काम ते तारक मेहता..... मधील यश, असा होता नट्टूकाकांचा प्रवास

By  
on  

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचं ३ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झालं.  नट्टू काका कर्करोगाने ग्रस्त होते. घनश्याम यांनी ५० वर्षांहून जास्त काळ मनोरंजन क्षेत्रात काम केलं आहे. पण त्यापुर्वीच्या आयुष्यात त्यांना संघर्ष करावा लागला होता. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही बाब बोलून दाखवली. ते म्हणतात, ‘आता यश मिळत असलं तरी  एकेकाळी मी ३ रुपये कमावण्यासाठी २४ तास काम केलं आहे. त्यावेळेस इतकं बजेट नसायचं. त्यामुळे अनेकदा मानधनही मिळत नसे. त्यावेळेस मी घराचं भाडं देण्यासाठी आणि मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी शेजाऱ्यांकडे उधार मागायचो. ते दिवस संघर्षपुर्ण होते. तारक मेहता सोबतच घनश्याम हे ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतही दिसले होते.

Recommended

Loading...
Share