‘रामायण’मध्ये रावण साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन

By  
on  

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चे जगभर चाहते आहेत. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. अरविंद त्रिवेदी ८२ वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळ आजारी होते. 

अरविंद त्रिवेदी रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांचा तो भारदस्त आवाज, तो दरारा पाहून टीव्ह पाहणा-या सामान्य प्रेक्षकांनासुध्दा तेव्हा घाम फुटायचा. लहान मुलांची तर घाबरगुंडीच उडायची. त्यांनी साकारलेला रावण कायमच लक्षात राहिली. अशी अजोड रावणाच भूमिका आत्तापर्यंत कुणीच साकारली नसेल. 

 

अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागरच्या रामायणात रावण बनून प्रेक्षकांची मने जिंकली, तर दुसरीकडे, त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःसाठी मोठे स्थान निर्माण केले . 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

Recommended

Loading...
Share