काजोलसोबत काम करणार सलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री

By  
on  

सिनेसृष्टीसाठी तो क्षण खास असतो जेव्हा दोन प्रतिभावान अभिनेत्री एका सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येतात. असच एका आगामी सिनेमाच्या बाबातीत होताना दिसेल. एकीकडे अभिनेत्री रेवती ही तिच्या दिग्दर्शनासाठी चर्चेत असतानाच ती लवकरच बॉलीवुड स्टार काजोलसोबत एकत्र झळकणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींची भारतीय सिनेविश्वात उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. या दोन्ही अभिनेत्री आता 'द लास्ट हुर्रा' या आगामी सिनेमातून एकत्र काम करणार आहेत.

एक खरी कहाणी आणि पात्रांपासून प्रेरित हा सिनेमा एक प्रेरणादायी कहाणीवर आधारित आहे. मां सुजाता नावाच्या पात्राभोवती ही कहाणी आहे. हा सिनेमा अद्याप प्री-प्रोडक्शन मध्ये असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल.

या सिनेमाच्या निमित्ताने काजोल आणि रेवती पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. याविषयी रेवती म्हणते की, "द लास्ट हुर्रामधील सुजाताचा प्रवास माझ्या ह्रदयाच्या जवळ आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे. जेव्हा सूरज, श्रद्धा आणि मी या सिनेमाविषयी चर्चा करत होतो तेव्हा काजोल ही पहिलीच अभिनेत्री होती जिचा विचार करण्यात आला. तिचे नाजूक मात्र ऊर्जादायी डोळे आणि सुंदर हास्य तुम्हाला विश्वास देतील की काहीही शक्य आहे आणि सुजाता अशीच आहे. मी काजोलसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे."

या सिनेमाविषयी काजोल म्हणते की, "जेव्हा मी द लास्ट हुर्राची कहाणी ऐकली तेव्हा मी लगेच सुजातासोबत जोडली गेली आणि मला वाटलं की त्यांचा प्रवास अविश्वसनीय रुपात एक प्रेरणादायी आहे. मला वाटतं की ही एक सुंदर प्रवास आहे आणि हे सगळ्यांसोबत शेयर करण्यासारखं आहे. रेवती मला दिग्दर्शित करत असल्याने या कहाणीसाठी मला सुजाताची भूमिका साकारण्यासाठी आणि तिची ताकद दाखवण्यासाठी शक्ति मिळते."

Recommended

Loading...
Share