By  
on  

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर प्रकरणात अक्षय कुमारचा एक फेक व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रयत्न

अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या तथाकथित गैरवर्तवणुकीच्या आरोपामुळे सिनेसृष्टीत मोठा वादंग पेटला आहे. कुठे काही सेलिब्रिटी नानांच्या बाजूने आहेत तर कुठे तनुश्री दत्ताच्या. म्हणूनच या सुरु असलेल्या वादामुळे दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत. राजकीय पक्षांनीसुध्दा आता या वादात नानांच्या बाजूंनी ठामपणे उभी राहण्याची कणखर भूमिका घेतलीय. तर दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळतच चाललं आहे. हे कमी की काय म्हणून आता बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा एक या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करणारा फेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आज आपण अनेक ओरिजनल व्हिडीओंचे एडीटींग करुन फेक व्हिडीओ तयार झालेले पाहतो तसंच त्यांचे मिम्ससुध्दा बनतात. पण आता सुपरस्टार अक्षय कुमारचा तयार करण्यात आलेला हा फेक व्हिडीओ समोर आला असून यात तो एका वेगळ्या पत्रकार परिषदेत इतर प्रश्नाचं उत्तर देत असून त्या उत्तराला मुद्दामून तनुश्री प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे अक्षय कुमारने जून महिन्यात भारत सरकारच्या कॅन्सर पिडीतांसाठी उपयुक्त ठरणा-या स्वस्थ भारत अंतर्गत स्वर्णसाथी उत्पादनाचे लॉंच त्याच्या हस्ते पार पडले. या दरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत एका पत्रकाराने  अक्षयला  त्याच्या आगामी गुडन्यूज या सिनेमात करिना कपूरसोबत काम करण्याविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तो थोडासा नाराज झाला. पण अक्षय अत्यंत संयमाने त्या पत्रकाराला म्हणाला, आपण वेळ-काळाचं भान ठेऊन प्रश्न विचारावेत. इथे ही पत्रकारपरिषद कुठल्या महत्त्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आली आहे, हे आधी तुम्ही जाणून घ्या. मग प्रश्न विचारा.

अक्षयचं हेच उत्तर खरा प्रश्न काढून टाकून आत्ता तनुश्री-नाना वादावर जोडून सध्या व्हायरल करुन त्याची या प्रकरणावरची ही प्रतिक्रिया म्हणून त्याला यात खेचण्यात येत आहे. सध्या अक्षय जैसलमेर यथे हाऊसफुल-4 च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याची प्रतिक्रिया याप्रकरणी उपलब्ध होऊ शकली नाही.

 

https://www.facebook.com/Pmoonupdates/videos/1823058787792639/

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive