दिवाळी होणार चंदेरी ! या दिवशी सिनेमागृहात दाखल होणार सुर्यवंशी

By  
on  

या 22 तारखेपासून महाराष्ट्रात सिनेमागृह सुरु होण्यास सुरुवात होते आहे.  त्यामुळे येत्या काळात थिएटर पुन्हा गजबजणार आहेत. यासोबतच अनेक मोठ्या बॅनरच्या सिनेमांच्या प्रदर्शनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
आता निर्माता करण जोहरने ट्वीट करत आगामी सुर्यवंशीची रिलीज डेटही शेअर केली आहे.

 

 

येत्या 5 नोव्हेंबरला म्हणजे ऐन दिवाळीत सुर्यवंशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  या सिनेमाची उत्सुकता ट्रेलरमुळे जास्त वाढली होती. पण करोना काळात लॉकडाऊन लागल्याने या सिनेमाच्या डेट्स पुढे गेल्या होत्या.  पण आता दिवाळीत पुन्हा एकदा सुर्यवंशीमुळे थिएटर गजबजेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share