Exclusive: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास करण जोहरसोबत घेणार नाहीत कॉफी

By  
on  

तुम्ही ही जी बातमीची हेडलाईन वाचताय ती दुर्देवाने खरी आहे. बॉलिवूडची देसी गर्ल आणि तिचा विदेशी प्रियकर निक जोनास हे दोघंही करण जोहरसोबत कॉफी घेणार नसल्याचं वृत्त नुकतंच आलं आहे. साहजिकच यामुळे चाहत्यांची पदरी घोर निराशा पडलीय. जेव्हापासून करणच्या 'कॉफी विथ करण' या सुपरहिट टॉक शोच्या 6 व्या सीझनची गोषणा झाली. तेव्हापासून या शोमध्ये कोणते कलाकार उपस्थिती लावणार याबाबत अजूनही प्रचंड उत्सुकता आहे.

प्रियंका आणि निक हे ग्लोबल कपल कॉफी विथ करणच्या या आगामी सीझनमध्ये उपस्थित राहणार अशी बरीच चर्चा रंगली होती. पण आता पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी अमेरिकेतील एका मिडीया हाऊससोबत करार केला आहे, की ते त्यांची लव्हस्टोरी इतर कोणासोबतही शेयर कjणार नाहीत. त्यामुळे हे कपल करणच्या शोमध्ये झळकणार नाही, इतकं मात्र नक्की. करणसोबत कॉफी घेण्याएवजी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास अमेरिकन टॉक शोमध्ये लावणार एकत्र हजेरी लावतील आणि आपल्या प्रेमाचे किस्से चाहत्यांसोबत शेयर करतील. कदाचित पुढील वर्षी म्हणजे त्यांच्या लग्नानंतर आगामी सीझनमध्ये ते झळकू शकतात.

दरम्यान कॉफी विथ करणच्या या सीझनमध्ये आलिया भट- दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूर-जान्हवी कपूर अशा हटके जोड्यांनी उपस्थिती लावल्याच्या माहितीनंतर आता आणकी कुठल्या जोड्या पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share