By  
on  

रणवीर-अजय-अक्षयची धमाकेदार केमिस्ट्री असलेल्या ‘सूर्यवंशी’च्या गाण्याने केला मोठा रेकॉर्डब्रेक

 अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाण्याचं नाव ‘आयला रे आयला’ असं आहे. हे गाणं अक्षयच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसत आहेत.

 ‘आयला रे आयला’ या गाण्याने आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 24 तासांत या धमाकेदार गाण्याने यूट्यूबवर 29.7 million व्ह्यूजचा पल्ला गाठत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित न ‘सुर्यवंशी’च्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive