एअरपोर्टवर कृत्रिम पाय काढून अभिनेत्री सुधा चंद्रन यांची तपासणी, सुधा यांनी व्यक्त केला संताप

By  
on  

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकत असलेल्या अभिनेत्री सुधा चंद्रन सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. सुधा चंद्रन यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडियोने लक्ष वेधलं आहे. सुधा चंद्रन यांना अनेकदा विमानप्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबाबत त्यांनी शेअर केलं आहे.

 

 

सुधा यांचे दोन्ही पाय कृत्रिम (प्रॉस्थेटिक) असून विमानतळावर ते काढून तपासणी केली जाते. याबाबत बोलताना त्या म्हणतात, ‘कृत्रिम पाय काढण्याची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे आणि त्या प्रत्येक वेळी विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांना ईटीडी टेस्ट करण्याची विनंती करते, मात्र काही उपयोग होत नाही आणि ते मला माझे कृत्रिम पाय काढायला सांगतात.

पंतप्रधान मोदींना मी हे विचारते. आपल्या समाजात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला हाच मान देते का? मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की कृपया ज्येष्ठ नागरिकांना एक कार्ड द्या. एअरपोर्टवर सतत पायांची तपासणी केली जाणं अत्यंत क्लेशकारक आहे.’

Recommended

Loading...
Share