By  
on  

SooryavanshiReview: सुर्यवंशीमुळे तुमची दिवाळी होणार अधिक धमाकेदार

सिनेमा : अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जावेद जाफरी, जॅकी श्रॉफ 
दिग्दर्शक : रोहित शेट्टी 
रेटिंग्ज: 4 मून्स 

 

 

 

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील महत्त्वाचा सिनेमा सुर्यवंशी आज रिलीज झाला आहे. पोलिस अधिका-यांच्या व्यक्तिरेखेत असलेले बॉलिवूडचे तीन सुप्रसिद्ध कलाकार या सिनेमात धमाल करताना दिसणार आहेत. हा सिनेमा अ‍ॅक्शनने पुरेपूर भरलेला आहे. एटीएसच्या हेडक्वार्टरमध्ये जिहादींशी दोन हात करताना हे सुपर कॉप दिसणार आहेत. ओमर हाफीज (जॅकी श्रॉफ) नावाचा जिहादी 1993 च्या हल्ल्यात शिल्लक असलेलं आरडीएक्स वापरुन पुन्हा एकदा 27 वर्षांनी मुंबईवर हल्ला करण्यासाठी सिद्ध झालेला असतो. 

 

यावेळी एटीएस प्रमुख वीर सुर्यवंशी (अक्षय कुमार) त्याच्या टीमसह दमदार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 1993 च्या बाँबस्फोटात अक्षयने त्याच्या आई-वडिलांना गमावलेलं असतं. त्यामुळे यावेळचा हल्ला रोखण्यासाठी वीर सुर्यवंशी कंबर कसून तयार झालेला आहे. सिनेमाचा उत्तरार्ध अतिशय मनोरंजक आहे. यामध्ये रोहित शेट्टीचे तिनही सुपर कॉप वीर सुर्यवंशी, बाजीराव सिंघम आणि संग्राम भालेराव म्हणजेच सिंबा एकत्र येताना दिसतात. सिनेमाचा हा मोस्ट एंटरटेनिंग सीन म्हणू शकतो.

 

या सिनेमात प्रत्येकानेच त्याच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम निभावली आहे. या सिनेमात अभिनेत्री रिया सुर्यवंशी (कतरिना कैफ) ही एका खास भूमिकेत दिसली आहे. अ‍ॅक्शन, डायलॉग डिलीव्हरीमध्ये हा सिनेमा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवताना दिसतो. अर्थात रोहित शेट्टीचा सिनेमा असल्याने नेहमीप्रमाणे कलाकारांप्रमाणेच कार्सही अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील यात शंका नाही. हा सिनेमा दिवाळीसाठी परिपुर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive