By  
on  

'हाऊसफुल 4'साठी जॅकी श्रॉफ करणार नाना पाटेकर यांना रिप्लेस

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादाचा फटका नाना पाटेकरांच्या सिनेमालासुध्दा बसला. 'हाऊसफुल 4' च्या चित्रिकरणात व्यस्त असलेल्या नानांवर लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप लागल्यानंतर या सिनेमावर नानांना आता पाणी सोडावं लागलं आहे. पण आता या सिनेमाबाबत एक महत्त्वाचं वृत्त हाती येतंय ते म्हणजे,'हाऊसफुल 4' या सिनेमातील नानांची जागा अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी घेतली आहे.

डीएनए वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांना जॅकी श्रॉफने सिनेमात रिप्लेस केले असून जॅकी लवकरच 'हाऊसफुल 4'च्या शुटींगला सुरुवात करतील. नानांनी शूट केलेले सर्व सीन्स जॅक श्रॉफ यांच्याकडून रिशूट करण्यात येणार आहेत.

आधी 'हाऊसफुल 4' या सिनेमासाठी संजय दत्त आणि अनिल कपूर यांचे नाव चर्चेत होते. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्या नावाचा विचारसुध्दा नाना पाटेकर यांच्या रिप्लेसमेंटसाठी करण्यात येत होता.

हाऊसफुल या सुपरहिट कॉमेडी सिरीजच्या या 4 थ्या भागाचे चित्रीकरण सध्या सुरु असून सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या दोघांसोबत काम करणार नाही अशी भूमिका सुपरस्टार अक्षय कुमारने घेतली होती.

‘हाउसफुल 4’ चे दिग्दर्शन आता साजिद खान याच्या ऐवजी फरहाद सामजी करणार आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive