By  
on  

ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाचं शुटिंग पुर्ण, टीमसोबत शेअर केला फोटो

तानाजीनंतर ओम राऊत ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊतच्या आदिपुरुषमध्ये भली मोठी स्टारकास्ट काम करताना दिसते आहे. प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनन, देवदत्त नागे आदि कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

 

या सिनेमाचं शुटिंग नुकतंच संपलं आहे. 103 दिवसांनंतर या सिनेमाचं शुटिंग संपलं आहे. ओमने स्टारकास्टसोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘हे आदिपुरुषचं शुटिंग रॅप आहे. एक रोमांचक प्रवास त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ही जादु तुमच्याशी शेअर करण्याची उत्सुकता आहे. देवदत्तसोबतच या सिनेमात तृप्ती तोरडमल आणि अभिनय बेर्डे झळकणार असल्याचंही समजत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive