By  
on  

प्रियंका-निक आधीच दीपिका-रणवीरची लगीनघाई; या दिवशी होणार लग्न?

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम लवकरच सुरु होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच बॉलिवूड लव्हबर्ड्स म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे या बजीराव-मस्तानीच्या लग्नाच्या तारखेवरुन सुरु झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळतोय.

डीएनए वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा सोहळा 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. 13 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर सात फेरे घेणार असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्याही लग्नाची तारीख 20 नोव्हेंबर होती पण आता ही तारीख आणखी लवकर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही खुप आनंदाची बातमी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे डेस्टिनेशन वेडींग स्विर्झंलॅँड किंवा इटली येथे होणार आहे. इटलीतील लेक कोमो येथे दीपिका –रणवीरचा लग्नसोहळा रंगणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच लग्नात दोघांच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल. तसंच त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दोन ठिकाणी होईल.बॉलिवूड आणि इतर काही मित्रपरिवारासाठी मुंबईत तर बंगळूर येथे दिपीकाच्या कुटुंबियासाठी असेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive