By  
on  

Video : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा दमदार टीझर पाहिलात का?

करोना लॉकडाऊनमुळे तब्बल दोन वर्षानंतर सिनेमागृह उघडली. यात बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाने प्रथम प्रदर्शित होत प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळवली. आता या सिनेमाच्या तुफान यशानंतर अक्षयचा दमदार ऐतिहासिकपट पृथ्वीराज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर या टीझरची वाहवा होतेय.

‘पृथ्वीराज’ सिनेमा महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या सिनेमात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकतेय. 

Recommended

PeepingMoon Exclusive