By  
on  

दीपिका-रणवीरचं या दिवशी होणार शुभलग्न सावधान,दोघांनी सोशल मिडीयावर केली घोषणा

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम लवकरच सुरु होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच बॉलिवूड लव्हबर्ड्स म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाच्या तारखेवरुन सुरु झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळतोय. नुकतंच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनीच खुद्द आपल्या लग्नाच्या तारखांबद्दल सोशल मिडीयावरुन सर्वांना माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे आपल्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांच्या हिंदी व इंग्रजीतल्या प्रतीसुध्दा यासोबत शेअर केल्या आहेत.

दीपिका आणि रणवीरने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी एक छोटा मेसेजसुध्दा या पत्रिकेवर लिहलाय."आम्हाला हे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आमचं लग्न 14 व 15 नोव्हेंबरला पार पडत आहे.  इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत." यामुळे दोघांच्या चाहत्यांसाठी ही खुप आनंदाची बातमी ठरते आहे.

https://twitter.com/RanveerOfficial/status/1053957452830593024

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे डेस्टिनेशन वेडींग स्विर्झंलॅँड किंवा इटली येथे होणार आहे. इटलीतील लेक कोमो येथे दीपिका –रणवीरचा लग्नसोहळा रंगणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच लग्नात दोघांच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल.

https://twitter.com/deepikapadukone/status/1053956519010725888

दीपिका आणि रणवीर या जोडीने आत्तापर्यंत गोलींयो की रासलीला रामलीला, बाजीराव-मस्तानी आणि पद्मावत हे तीन सुपरहिट सिनेमे एकत्र केले आहेत. या दोघांची लव्ह-स्टोरी मागील पाच वर्षांपासून सुरु आहे. 2013 पासून हे दोघं एकमेकांना डेट करतायत. आता ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री ख-या आयुष्यातसुध्दा रंगणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive