By  
on  

'इंडियन आयडॉल 10' मधून अनू मलिकची हकालपट्टी, सलीम-सुलेमान पहिले गेस्ट जज

गायक-संगीतकार अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप अनेक महिलांनी केल्यानंतर 'इंडियन आयडॉल 10' या संगीत रिएलिटी शोच्या परिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. सध्या सिनेइंडस्ट्रीत सुरु असेलेल्या #MeToo वादळात पार्श्वगायिका सोना मोहपात्रा, श्वेता पंडित यांसोबतच आणखी दोन महिलांनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे धक्कादायक आरोप केले आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांना या शोमधून ही परिक्षक पदाची खुर्ची सोडावी लागलीय. आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हा मोठा प्रश्न होता.

मिडीया रिपोर्टसनुसार, इंडियन आयडॉल 10 मध्ये अनू मलिक यांना पहिले रिप्लेस करणारे गेस्ट जज आहेत, गायक-संगीतकार जोडी सलीम-सुलेमान. हे दोघं एक आठवडा विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांच्यासोबत या शोचं परिक्षण करतील. प्रत्येक आठवड्याला नवीन  जज विशाल आणि नेहासोबत परिक्षकपदी विराजमान होतील. महत्त्वाचं म्हणजे अनू मलिक यांच्यावर जेव्हापासून आरोप होऊ लागले तेव्हापासून सोनी टेलिव्हिजनच्या टीममध्ये त्यांच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली होती.अखेर त्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive