By  
on  

..........या खास कारणासाठी दीपिका-रणवीर 15 नोव्हेंबरला करणार लग्न

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची शुभवार्ता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या लग्नाची तारीख बॉलिवूड आणि चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांची लग्नघटीका फक्त अवघ्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलीय. त्यामुळे चाहत्यांमध्ये संर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. पण तुम्हाला माहितीय का, 15 नोव्हेंबरला बोहल्यावर चढण्यामागे या दोघांचं एक खास कारण आहे.

आजपासून पाच वर्षांपूर्वी रणवीर-दीपिकाच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. संजय भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला रामलीलाचिया सेटवर या दोघांचं प्रेम खुललं. या जोडीच्या केमिस्ट्रीला अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची खरी केमिस्ट्री रामलीलापासूनच सुरु झाली. या दोघांच्या जोडीचा रामलीला हा पहिला सिनेमा 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. म्हणूनच आपल्या प्रेमाची खास आठवण म्हणून याच दिवशी हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत.

2013 पासून हे दोघं एकमेकांना डेट करतायत. आता ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री ख-या आयुष्यातसुध्दा रंगणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive