By  
on  

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोंनो! अर्जुन कपूर-मलायका अरोराची वाढली जवळीक

सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी मलायका अरोराने घटस्फोट घेतला तेव्हापासूनच अरबाज व मलायकानं हा इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारणचं स्पष्ट होत नव्हतं. पण आता हळूहळू यामागचं कारण स्पष्ट होऊ लागलं आहे.

एकीकडे अरबाजनं त्याच्या नव्या प्रेयसीसोबतचं आपलं नातं जाहीर करायला सुरुवात केली असून इथे मलायकासुध्दा अभिनेता अर्जुन कपूरसोबत बिनधास्त फिरु लागली आहे. मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. दीड महिन्यापूर्वीच लॅक्मे फॅशन वीकच्या एका शोमध्ये हे दोघंही अगदी एकमेकांच्या बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट केलं गेलं.पण महत्त्वाचं म्हणजे हे दोघंही नुकतेच इंडियाज गॉट टॅलेंट 8 या रिएलिटी शोच्या मंचावर चक्क एकमेकांच्या हातात हात घालून मंचावर आल्याचं सर्वांनीच पाहिलं. त्यामुळे या दोघांचाही खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोंनो, असाच अंदाज यावेळी व्यक्त होताना दिसला.

'नमस्ते इंग्लड' सिनेमाच्या प्रोमोशनसाठी अर्जुन कपूर या शोमध्ये उपस्थित होता. तर मलायका या शोची परिक्षक आहे. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सर्वांनाच आता हे दोघं आपलं नातं जाहीरपणं कबुल करणार का, हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive