By  
on  

एकटीने मुलीचा सांभाळ करणं माझ्यासाठी खुप कठीण होतं : नीना गुप्ता

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वत:चं एक स्थान निर्माण करणा-या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यावर सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या सिनेमातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी कौतुकांचा वर्षाव होतोय. पण नुकतंच एका मुलाखती दरम्यान नीना गुप्ता यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मन मोकळं केलं.

नीना गुप्ता एका वेबासाईटशी बोलताना म्हणाल्या, “माझ्यासाठी हा प्रवास फारच कठिण आणि कष्टप्रद होता. माझ्याजवळ तेव्हा पैसेही नव्हते. जगण्यासाठी पैसा ही महत्त्वाची गोष्ट असते व त्यानंतर तर माझ्याकडे पती व नातेवाईकसुध्दा नव्हते. पण माझ्या मुलीचा जन्म झाला आणि माझं सुख परतलं. मसाबामुळे मला मातृत्व सुख लाभलं माझ्या मुलीने मला कधीच त्रास दिला नाही.”

जेव्हा मसाबाचा जन्म झाला तेव्हा नीना गुप्ता या सिंगल मदर होत्या. मसाबा ही नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि रिचर्ड्स हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांनी लग्न केलं नाही.

त्यानंतर 2008 मध्ये नीना यांनी एका दिल्लीस्थित व्यावसायिकाशी अमेरिकेत लग्नगाठ बांधली होती. नीना गुप्ता या हिंदी मालिकांसह बॉलिवूडमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकतायत. त्यांच्या ‘बधाई  हो’ सिनेमाने 21 ऑक्टोबरपर्यंत 45 कोटींची बॉक्स ऑफीस कमाई केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive