By  
on  

प्रभासच्या वाढदिवसानिमित्त उलगडला ‘साहो’चा टिझर; काही मिनिटांतच मिळाले लाखों व्ह्यू

सुपरस्टार प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी  ‘शेड्स ऑफ साहो’ सिनेमाचं टिझर उलगडलं. फिल्ममेकर्सनी त्याचा हा टिझर प्रदर्शित करुन जणू काही एक खास भेटंच दिली. हा टिझर उलगडला आणि काही मिनिटांतच त्याला लाखों व्ह्यूज मिळाले. यात या शानदार सिनेमाचं मेकिंग पाहायला मिळतंय. यासाठी झटणारी हजारो लोकांची मेहनत दिसून येते.

‘साहो’ सिनेमाच्या या जवळपास 22 सेकंदाच्या टिझरमध्ये अॅक्शन आणि थ्रीलने भरपूर आहे. प्रभासच्या वाढदिवसाची ही भेट यामगचं कारण म्हणजे त्याच्या दमदार एन्ट्रीसोबतच हॅप्पी बर्थ डे प्रभास, असं लिहलेलं पाहायला मिळतंय. सर्वंचजम आता प्रभासचा हा सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत.

या बिग बजेट सिनेमात प्रभाससोबतच  बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत असून हिदींसोबतच हा सिनेमा तेलुगू, तमिळमध्ये डब होणार आहे.या सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://youtu.be/huw6wD_1ppE

गुलशन कुमार टी-सीरीज़ आणि भूषण कुमार आणि यूव्ही क्रिएशन प्रोडक्शन  प्रस्तुत “साहो” सुजीत दिग्दर्शित करत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive