By  
on  

जाणून घ्या, तुमची आवडती वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स 2'ची शुटींग कधी सुरू होतेय

नवाजुद्दीन सिध्दीकी, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्या अभिनयाने सजलेली नेटफ्लिक्सची सुपरहिट वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'च्या दुस-या सीझनची घोषणा झाली आणि इथे काहीतरी गालबोट लागल्यासारखं त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहीलं. कारण होतं, ते या वेबसीरिजची निर्मिती करणारी फॅण्टम फिल्म्स बंद झाल्याचं. प्रेक्षकांनासुध्दा आता आपल्या आवडती वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स 2' पाहायला मिळते की नाही, याची चिंता लागून राहिली.

बॉलिवूडमध्ये सध्या सुरु #MeToo मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक विकास बहल याच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे फॅण्टम फिल्म ही कंपनी बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनं घेतला. हे तिघंही ‘फॅण्टम फिल्म’ बॅनर अंतर्गत भागीदार  होते. विक्रमादित्य आणि अनुराग या दोघांनी सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे विकास बहलसोबत भागीदारी असल्यानं विक्रमादित्य आणि अनुरागसोबत काम करावं की नाही, याबाबत नेटफ्लिक्सला साशंकता होती. तर दुसरीकडे या प्रसिध्द सीरिजचा लेखक वरूण ग्रोवरवरसुध्दा लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होते. पण आता या सर्व अडचणींमधून सेक्रेड गेम्स 2 च्या भवितव्याबाबत दाटलेला अंधार आता दूर झाला असून प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बहुप्रतिक्षित सेक्रेड गेम्स 2चं शुटींग पुढील वर्षी मार्च 2019 पासून सुरु होणार आहे. नेटफिल्क्सने आपल्या सर्व शंकांचं मिरसन करुन हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान नोव्हेंबरमध्ये याचॆ शुटींग सुरू होणार होतं पण स्टारकास्टकडे इतर प्रोजेक्टसमुळे तारखांची अडचण होती.

आता लवकरच प्रेक्षकांना गणेश गायतोंडेची अधुरी असलेली थरारक कथा पूर्ण पाहण्साठी फक्त काही महिनेच वाट पाहावी लागणार ाहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive