By  
on  

गुड न्यूज! तो लवकरच मुंबईत येतोय

आपल्या सर्वांचा तो खुप लाडका आहे. त्याच्या अभिनयाचे लहान-मोठे सर्वचजण प्रचंड चाहते आहेत. त्याच्या अभिनयात आणि व्यक्तिरेखांमध्ये नेहमीच वैविध्य पाहायला मिळतं. पण बराच काळ तो प्रेक्षकांपासून लांब आहे, पण चिंता नसावी. तो लवकरत परततोय. तुम्ही म्हणाल कोण,कोणाबद्दल बोलताय. अहो, एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता इरफान खान येत्या तीने ते चार दिवसांत भारतात परततोय.

इरफान खान भारतात परतणार म्हणजे नक्कीच त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली असणार एवढं मात्र नक्की. इरफानच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे, जोपर्यंत ते पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत सिनेमाच्या सेटवर येणार नाही. भारतात परतल्यावर संपूर्ण विश्रांती घेऊनच डिसेंबरमध्ये ‘हिंदी मिडीयम’च्या सिक्वेलच्या शुटींगला सुरुवात करणार आहे.

चाहते इरफानच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याच्या सिनेमातील पुनरागमनाकडे डोळे लावून बसले आहेत.‘हिंदी मिडीयम’ची टीम स्क्रिप्ट घेऊन इरफानच्या भेटीसाठी लंडनला गेले होते. इरफानने त्यांना तिथेच होकार दिला होता. तेव्हापासून सर्वांनाच त्याच्या सिनेमातील नव्या इनिंगची प्रचंड आतुरता लागली आहे.

‘न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर’ या आजाराने ग्रस्त असलेला इरफान खान लंडनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून उपचार घेत आहेत. पण आता चाह्त्यांना त्याच्या पुनरागमनाची गुड न्यूज मिळालीय.

Recommended

PeepingMoon Exclusive