By  
on  

सैफ अली खानने केला लाडक्या तैमूरच्या नावाबाबतचा खुलासा

जेव्हा बॉलिवूडची बेगम करिना कपूर खान आणि नवाब सैफ अली खान यांनी आपल्या लाडक्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हा प्रचंड वाद निर्माण झाला.अनेक लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. बॉलिवूड आणि सर्व चााहत्यांमध्येसुध्दा या नावावरुन ब-याच चर्चा रंगल्या. तैमूरचं नाव का ठेवलं, हा प्रश्न सर्वांना सतावत होता. तैमूर नावाचा भारतावर आक्रमण करणारा क्रूर राजा होऊन गेला. भारतात त्याने खुप खून आणि हिंसा केली होती.

सध्या तर आई-बाबांपेक्षा तैमूरचं सेलिब्रिटी म्हणून फोटोग्राफर्सचा गराडा घेऊन वावरतो. तो जिथे जाईल तिथे त्याची एक झलक टिपण्यासाठी एकच कल्ला होतो. हल्ली तैमूरला टिम-टिम या टोपण नावानं बोलावलं जातं. जेव्हा फोटो जर्नलिस्टनी त्याला तैमूर तैमूर म्हणून कॅमे-याकडे पाहण्यासाठी हाक मारली, तेव्हा त्यानेच स्वत:हूनच क्यूटपणे टिम टिम म्हणा असं त्यांना सांगितलं.

आपल्या मुलाच्या नावाबाबत खुलासा करताना सैफ म्हणाला,"भारत हा सेक्युलर देश आहे. तैमूरचा शब्दशः अर्थ लोखंड/पोलाद असा होतो,म्हणून आम्ही त्याचं हे नाव निवडलंय. मी त्याचं नाव व्यक्ती किंवा कोणत्या विशेषणवरुन ठेवलेलं नाही."

Recommended

PeepingMoon Exclusive