'दंगल गर्ल' झायरा वसीमला कोर्टात हजर व्हावं लागणार, कोर्टानं पाठवलं समन्स

By  
on  

'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी आणि सिक्रेट सुपरस्टार सिनेमातील भूमिकेमुळे कौतुकास पात्र ठरलेली अभिनेत्री झायरा वसीम हिला कोर्टाने हजर राहण्यास सांगितलं आहे.यासाठी तिला कायदेसीर समन्सही पाठवण्यात आलं आहे.
विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करताना मागील वर्षाी झायरा वसीम हिच्यासोबत विकास सचदेव याने छेडछाड केली होती. या छेडछाडीचा व्हिडीओ खुद्द झायरानेच सोशल मिडीयावर शेअर केला होता.

झायराने या संपूर्ण प्रकरणाची सहारा पोलिसांत रितसर तक्रार केली होती. याप्रकरणी अनेक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर 10 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी घेत दखल घेत विकास सचदेव विरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. पण नंतर त्याची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि सशर्त जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणाच्या ट्रायलाल सुरुवात झाली आहे. अभिनेत्री झायरा वसीम या संपूर्ण प्रकरणाची तक्रारदार आणि साक्षीदारसुध्दा आहे. वकीलांना तिच्यासमोरच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करायची असल्याने 1 नोव्हेंबर 2018 रोजी तिला कोर्टात हजर राहावं लागेल.

यापूर्वीसुध्दा मुंबई पोलिसांनी याप्रकरणी झायरा वसीमला पोलिसांत आपलं संपूर्ण स्टेटमेंट नोंदवण्यासाठी चारवेळा नोटीस पाठवली होती. पण झायरा उपस्थित राहिली नाही.

काय होते प्रकरणः

विमानात आपल्या जागेवर झायरा झोपलेली असताना अगदी तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या विकास तिच्या सीटवर आपला पाय टाकून झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता,असं तिचं म्हणणं होतं. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली . हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. तिच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही, असा आरोपही तिने केला.

Recommended

Loading...
Share