By  
on  

सिंबामध्ये दिसला सारा अली खानचा बोल्ड लूक

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानच्या केदारनाथचा सिनेमाचा टिझर आपण पाहिलाच आहे. सुशांत सिंग राजपूतसोबतची तिची टिझरमध्ये दिसलेली केमिस्ट्री भन्नाट असणार हे नक्की. पण आता लवकरच ती अभिनेता रणवीर सिंहसोबत सिंबा सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातला साराचा एक बोल्ड अवतार नुकताच पाहायला मिळाला. खुद्द सारानेच या फर्स्ट लुकचा फोटो आपल्या सोशल मिडीयावर अपलोड केला आहे.

या ब्लॅक आणि व्हाईट फोटोमध्ये सारा एकदम बोल्ड आणि बिनधास्त दिसतेय. एका जबरदस्त बाईकरसोबत ती संवाद साधायचा प्रयत्न करतेय. सोबतच तिने या फोटोला कॅप्शन दिलंय, रोहीत शेट्टीची हिरोईन #Simba. या सिनेमाचा शानदार ट्रेलर 28 डिसेंबरला उलगडणार आहे.

https://www.instagram.com/p/BprAA4bnOQt/

अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ हा साराचा डेब्यू सिनेमा आहे. त्यानंतर तिचा सिंबा प्रदर्शित होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive