By  
on  

पाहा Video : या ट्रेंडिंग गाण्यावर धकधक माधुरी दीक्षितनेही केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर सध्या डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर डान्स रिल्सचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोशल मिडीयावर हे डान्स रिल्स व्हायरल होताना दिसतात. त्यात मनोरंजन विश्वातील कलाकार या ट्रेंडमध्ये मागे नाहीत. 

"लेझी लाड संया" या गाण्यावर तर सध्या मोठ्या प्रमाणात डान्स रिल्स केले जात आहेत. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर व्हिडीओ करताना दिसत आहेत. यातच या गाण्यावर अशा नृत्यांगनाने डान्स केलाय की जिचे असंख्य चाहते आहेत. ती सौंदर्यवती म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने. 

माधुरीनेदेखील या गाण्यावर डान्स रिल करून सोशल मिडीयावर शेयर केला आहे. माधुरीच्या या डान्स व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. 

 

सोशल मिडीयावर कोणताही नवा ट्रेंड आला की माधुरी त्यात सहभागी होताना दिसते. सोशल मिडीयावर माधुरीच्या व्हिडीओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि लाखो लाईक्स असतात. असाच हा व्हिडीओही आता चर्चेत आला आहे. माधुरीचे विविध डान्स व्हिडीओ हे सोशल मिडीयाव व्हायरल होत असतात. माधुरी आणि डान्स हे कॉम्बिनेशल प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना कायम आवडत. म्हणूनच चाहत्यांसाठी माधुरी तिचे विविध डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करताना दिसते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive