By  
on  

रणवीरच्या घरी लगीनघाई, हळदी समारंभाची पाहा धम्माल

बॉलिवूड लव्हबर्डस रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे दोघांच्याही घरी यंदाची दीवाळी खास असून जोरदार लगीनघाई सुरु झाली आहे. दीपिकाच्या बॅंगलोर येथील घरी नुकतीच नंदी पूजा हे लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून करण्यात आली. आता तर रणवीरच्या घरी हळदी समारंभसुध्दा पार पडला. नेहमीप्रमाणेच रणवीर या समारंभात मोठ्या जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाला.

घराच्या बाल्कनीत आपल्या नातेवाईकांसोबत रणवीर भलताच खुशीत दिसला. खुश होण्यामागचं कारण पण तसंच आहे. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता दोघं लवकरच जीवनसाथी होणार आहेत. चाहत्यांसोबतच संपूर्ण बॉलिवूडला आता या विवाहसोहळ्याची आतुरता लागली आहे.

https://www.instagram.com/p/BpwQ7SpF3-0/

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive