By  
on  

विराटच्या वाढदिवसानिमित्ताने अनुष्काने मानले देवाचे आभार

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींची उत्सुकता चाहत्यांना असते. लग्नानंतर तर त्याचं नातं आता आणखीनच खुलताना पाहायला मिळतंय. दोघंही आपल्या बिझी शेड्यूलमधून आवर्जून ब्रेक घेत एकमेकांना वेळ देतात. अनुष्कासुध्दा शक्य असेल तेव्हा विराटसोबत क्रिकेट दौ-यावर जाते, जेणेकरुन एकमेकांसोबत त्यांना काही सुखद क्षण घालवता यावे.

आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. पण विराटपेक्षा अनुष्कासाठीच हा दिवस स्पेशल आहे. एकमेकांची साथ देत अशाच या महत्त्वाच्या दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देवाचे आभार मानले आहेत. Thank God for his birth,असं कॅप्शन देत अनुष्काने सोशल मिडीयावर विराटसोबतचा एक खुपच लव्हेबल आणि क्यूट फोटो पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांकडून अनुष्का-विराटच्या या फोटोला आणि मेसेजला चाहत्यांकडून खुप पसंती मिळतेय.

https://twitter.com/AnushkaSharma/status/1059314552851128321

विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या सेलिब्रिटी कपलचं काहीतरी जंगी आणि खास प्लॅनिंग असणार एवढं मात्रं नक्की!

काहीही असो नांदा सौख्य भरे!

Recommended

PeepingMoon Exclusive