By  
on  

इरफान खान भारतात परतणार,कुटुंबियांसोबत नाशिकमध्ये साजरी करणार दिवाळी

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या इरफानवर लंडन येथे उपचार सुरु आहेत. पण यंदा तो दिवाळीसाठी मात्र भारतात परतणार आहे आणि नाशिक येथील त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.

पण भारतात कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर इरफान पुन्हा लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान इरफान हिंदी मिडीयम सिनेमाच्या सिक्वेलच्या शुटींगला दिवाळीनंतर सुरुवात करणार असं बोललं जात होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अद्याप तरी डॉक्टरांनी इरफानला पूर्णपणे काम करण्याची परवानगी दिलेले नाही. पण येत्या मार्चपर्यंत इरफान कामावर परतू शकेल, असे मानले जात आहे. पण यादरम्यानही त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल.

काही दिवसांपूर्वी ‘हिंदी मिडियम’चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला सिक्वेलची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. २०१७ साली प्रदर्शित झालेला इरफानचा ‘हिंदी मिडियम’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. म्हणूनच सिक्वेलचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. पण आता इरफानला जेव्हा डॉक्टर हिरवा कंदील देतील तेव्हाच पुढील सूत्रं हलतील.

Recommended

PeepingMoon Exclusive