By  
on  

सोनाली बेंद्रेने पती आणि मुलासोबत साजरी केली न्यूयॉर्कमध्ये दिवाळी

बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. सध्या न्यूयॉर्क येथे ती उपचार घेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती कॅन्सरशी झुंज देत आहे. पण तरीही दिवाळी सणाचा आनंद तिने कुटुंबियांसमवेत घेतला आहे.

सोनालीनं इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्कमधल्या दिवाळीचा फोटो शेअर करत म्हटलं आहे,"इथे मुंबईपेक्षा खूप उशीरा दिवाळी साजरी होते म्हणूनच मी उशीरा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. यंदाची दिवाळी मी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली नाही. इथे भारतीय पद्धीतीचे पारंपरिक कपडे माझ्याकडे नाही, त्यामुळे रोजचेच कपडे घातले. छोटीशी पूजा केली पण, तरीही जे काही केलं ते पूर्ण मनापासून केलं". यासाोबतच तिने पती आणि मुलगा रणवीरसोबत फोटो शेअर केला आहे. तसेच सुख समुद्धी आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छाही सोनालीनं आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Bp5_cJPBH8L/

Recommended

PeepingMoon Exclusive