By  
on  

या कारणासाठी करिना सैफची शॉपिंग करत नाही

बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान हे कपल नेहमीच त्यांच्या फॅशन सेन्स आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असतं. आता तर त्यांचा गोंडस मुलगा तैमूरसुध्दा नेहमीच प्रसिध्दी झोतात असतो. पण पत्नी करिना कधीच  आपल्यासाठी शॉपिंग करत नाही किंवा कपड्यांची निवड करत नाही, असा खुलासा खुद्द सैफनेच एका कार्यक्रमादरम्यान केला.

सैफने त्याच्या मित्रांसोबत एक फॅशन रिटेलर खरेदी करुन स्वत:चा ब्रॅन्ड असलेला 'हाऊस ऑफ पतौडी' लॉन्च केला आहे.या ब्रॅन्डद्वारे तो त्याच्या जुन्या परंपरेची ओळख नव्याने लोकांना करुन देऊ इच्छितो. 'मला कपडे खूप आवडतात. मला कपड्यांची समजही आहे. आजकाल अनेक लोक कपडे ऑनलाईन खरेदी करतात. त्यासाठी मी 'हाऊस ऑफ पतौडी' लॉन्च केले आहे', असे सैफने माध्यमांशी बोलताना सांगितले.

यादरम्यान पत्रकारपरिषदेत सैफला करिना तुझी शॉपिंग करते का, असं विचारल्यावर तो हसून म्हणाला. करिना माझ्यासाठी शॉपिंग करत नाही. अर्थात तिची निवड चांगलीच आहे. पण स्त्री-पुरुषांच्या कपड्यांबाबत प्रत्येकाची निवड वेगळी असते इतकंच. तसंही आमच्या वयातही बरंच अंतर आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive