By  
on  

सुष्मिता सेनही चढणार बोहल्यावर?

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायत. प्रियंका-निक आणि रणवीर-दीपिका यांच्यानंतर आता अभिनेत्री सुष्मिता सेन बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे.सुष्मिता सेनही विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाल्या आहेत.सुश्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरताना दिसतेय. तर नुकतंच शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत हे कपल एकत्र दिसले होते.

सुष्मिता आता ४२ वर्षांची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी तिनं ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर नाव कोरलं. बॉलिवूडमध्ये तिने मोजकेच सिनेमे केले असले तरी रॅम्प वॉकवर तिची जादू कायम आहे. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी तिनं एका मुलीला दत्तक घेतलं. पंधरा वर्षांहून अधिक काळ झाला ती एकटीनं दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलींचं संगोपन करत आहे.

https://www.instagram.com/p/Bp2gU0Qn07D/

सुष्मिता आणि रोहमन गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटदरम्यान या दोघांचीही भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहेत. सध्या दिवाळीतसुध्दा रोहमन सुष्मिता आणि तिच्या मुलींसोबत धम्माल मस्ती आणि आनंदाचे काही क्षण व्यतीत करतावा पाहायला मिळाला. त्यामुळे त्याची यांच्यासोबत जमलेली गट्टी पाहता पुढच्यावर्षीपर्यंत ते लग्न करतील असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive