By  
on  

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने मराठीत केला नमस्कार, जिंकली महाराष्ट्राची मनं

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्या राज्याचा अभिमान आहे. जेव्हा एखादा पाहुणा आपल्या राज्यात येतो आणि आपल्या मातृभाषेत संवाद साधतो, तेव्हा अभिमानाने ऊर भरुन येतो. असाच एक अभिमानास्पद क्षण एका पत्रकार  परिषदेत अनुभवायला मिळाला. दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगलीय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत उपस्थितांशी संवाद साधत नमस्कार केला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

यावेळी अल्लू अर्जुन जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला तेव्हा तो म्हणाला, ‘सगळ्यांना माझा नमस्कार…’ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज देण्यात आला आहे. 

 

‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive