By  
on  

आली समीप लग्नघटिका! रणवीर-दीपिका इटलीसाठी रवाना

रणवीर आणि दीपिका बोहल्यावर चढण्यासाठी इटली येथे कुटुंबियांसह रवाना झाले आहेत. विमानतळावर या लव्हबर्ड्सना कॅमे-याने कैद केलं. त्यामुळे आता आली समीप लग्नघटिका अशीच म्हणण्याची वेळ आलीय.

येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी हा भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आणि १ डिसेंबर रोजी मुंबईत स्वागतसमारंभाचं आयोजन करण्यात येईल. इटलीत विवाहसोहळ्याला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहणार असल्याने मुंबईतील स्वागत समारंभ खास बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

दीपिका आणि रणवीरने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांनी एक छोटा मेसेजसुध्दा या पत्रिकेवर लिहला.”आम्हाला हे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आमचं लग्न 14 व 15 नोव्हेंबरला पार पडत आहे.  इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.” यामुळे दोघांच्या चाहत्यांसाठी ही खुप आनंदाची बातमी ठरते आहे.

दीपिका आणि रणवीर या जोडीने आत्तापर्यंत गोलींयो की रासलीला रामलीला, बाजीराव-मस्तानी आणि पद्मावत हे तीन सुपरहिट सिनेमे एकत्र केले आहेत. या दोघांची लव्ह-स्टोरी मागील पाच वर्षांपासून सुरु आहे. 2013 पासून हे दोघं एकमेकांना डेट करतायत. आता ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री ख-या आयुष्यातसुध्दा रंगणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive