By  
on  

सारा अली खान आणि सुशात सिंगच्या ‘केदारनाथ’चा उलगडला ट्रेलर

अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणातील ‘केदारनाथ’ या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या सिनेमात साराचा नायक आहे, अभिनेता सुशांत सिंग राजपूत .

‘केदारनाथ’ सिनेमात सारा आणि सुशांतची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ही लव्हस्टोरी खुलवण्यात येत असल्याचा अंदाज या सिनेमाच्या ट्रेलरवरुन येतोय. तसंच महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलाची ही विलक्षण प्रेमकहाणी दाखविण्यात येणार आहे. प्रेमात अडसर ठरत असलेला धर्म आणि त्यात अचानक येणारा प्रलय अशी नाट्यमय प्रेमकथा आहे.

यापूर्वी दिग्दर्शक अभिषेक कपूरने केदारनाथचचं एक पोस्टर शेअर करत ट्विट केलं होतं,” निसर्गाचा कोणताच रौद्र अवतार किंवा कोणतीही दैवी शक्ती प्रेमाची पराभव करु शकत नाही.” येत्या ७ डिसेंबर रोजी ‘केदारनाथ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष सारा अली खानकडे लागले आहेत. सर्वांनाच आता साराच्या या पहिल्या-वहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागलीय.

https://youtu.be/03-KVRmd3xo

Recommended

PeepingMoon Exclusive