विराट-अनुष्काचा वेडिंग फोटोग्राफरच दीप-वीरच्या लग्नात?

By  
on  

कोणत्याही सिनेमापेक्षा सध्याच्या घडीला दीप-वीरचं लग्न ही सध्याची सर्वात चर्चीली जाणारी बातमी आहे. लग्नघटिका समीप आली असून लवकरच दीपिका आणि रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत.

दीप-वीर लग्नात कोणता पेहराव करणार, ते कसे दिसणार, लग्नातील संगीत कसं असेल, त्यांचे नातेवाईकसुध्दा डान्स परफॉर्म करणार का अशा नानाविविध प्रश्नांनी सध्या चाहत्यांना भांडावून सोडलंय. लग्नासाठी आता काहीच क्षण उरलेत फक्त. नुकतीच एक खास बातमी आहे, ती म्हणजे बॉलिवूडमध्ये काही महिन्यांपूर्वीच गाजलेलं आणि इटलीत शाही पध्दीनं पार पडलेलं अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्न ज्या वेडिंग फोटोग्राफरने कव्हर केलं, तेच दीप-वीरच्या लग्नातील अविस्मरणीय क्षण कॅमे-यात टिपणार आहेत. ‘द वेडिंग फिल्मर’ असं या कंपनीचं नाव असून त्यांनाचं दीप-वीरच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं समजतंय.

विराट आणि अनुष्काचे फोटो दीपिका-रणवीरला आवडल्यामुळेच त्यांनी आपले ते सुखद क्षण कैद करण्यासाठी हा निर्णय घेतला. विरुष्कानंतर आता दीप-वीर हे सेलिब्रिटी कपल इटलीत लग्नगाठ बांधत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या खासगी लग्नसोहळ्यात दीपिका-रणवीर यांनी पाहुण्यांना मोबाईल फोन आणि कॅमे-याशिवाय येण्याची विनंती केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नावरुन धडा घेत हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. लग्नातील खास क्षणाचे फोटो बाहेर व्हायरल होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे.

विरुष्का सारखंच दीप-वीरच्या लग्नानंतर दोन रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. पहिलं रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बंगळूर येथे तर 28 नोव्हेंबरला मुंबईत होणार असून, ज्यात अवघं बॉलिवूड लोटणार आहे.

 

Recommended

Share