By  
on  

अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रिया रुंचाल यांना करोनाची लागण

बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या बातमीनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. जॉननं स्वतःच याबाबतची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. देशात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना जॉननं लिहिलं, ‘३ दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. मला नंतर समजलं की ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह होती. आता मला आणि माझी पत्नी प्रियाला करोनाची लागण झाली आहे. आम्ही दोघंही घरीच क्वारंटाइन आहोत. आमचं दोघांचंही लसीकरण पूर्ण झालं आहे आणि आम्हाला करोनाची फारच सौम्य लक्षण दिसत आहेत. कृपया सर्वांना काळजी घ्या. सुरक्षित राहा. मास्कचा वापर करा.’

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive