By  
on  

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला करोनाची लागण

गेल्या दोन वर्षापासून जगभर ठाण मांडून बसलेल्या करोनाने पुन्हा एकदा आपलं थैमान सुरु केलं आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड  कलाकारांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातच आता ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिध्द खलनायक प्रेम चोप्रा यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीलासुध्दा करोना झाल्याचे समजतेय. 
 

प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८६ वर्षीय प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती बरी असून एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive