या कंडोम ब्रॅंडकडून हटके अंदाजात मिळाल्या दीपिका-रणवीरला शुभेच्छा !

By  
on  

इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीप-वीर ही बॉलिवूडची सर्वात सुपरहिट जोडी 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने विवाहबध्द झाली. आज 15 नोव्हेंबरला या दोघांचा सिंधी रिती-रिवाजानुसार विवाह पार पडणार आहे.

दीपिका-रणवीर या लाडक्या जोडीवर बॉलिवूडसह देशभरातून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतंच अमूल या देशातील क्रमांक 1च्या डेअरी कंपनीने डिलीशीयस शुभेच्छा दिल्यानंतर आता ड्यूरेक्स या कंडोम ब्रॅंडकडून अगदी हटके अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पण ड्युरेक्सकडून देण्यात आलेल्या या हटके शुभेच्छा सोशल मिडीयावर मात्र कमालीच्या व्हायरल होत आहेत.सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे. ही जाहिरात ब्रँडच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "We've got you covered." दीप-वीर यांना शुभेच्छा देत या ब्रॅंडने एकप्रकारे आपली जाहिरातीसाठीच ही शक्कल लढवलीय.

https://twitter.com/DurexIndia/status/1062656595916664832

'ड्युरेक्स'ने याआधी विराट कोहली- अनुष्का शर्मा, सोनम कपूर - आनंद आहुजा या जोड्यांनादेखील अशाच हटके आणि मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Share