वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा'मधून फर्स्ट लुक समोर

By  
on  

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन म्हणजे हजारो दिलों की धडकन. त्याच्या प्रत्येक सिनेमावर चाहते जीव ओवाळून टाकतात. अभिनयासोबतच त्याच्या डान्सचे देशबरच नाही तर जगभर चाहते आहेत. त्याला ग्रीक गॉडसुध्दा म्हणतात. आज 10 जानेवारी या डॅशिंग सुपरस्टारचा वाढदिवस. यंदा तो 48 वा जन्मदिवस साजरा करतोय. सपर ३० च्या रिलीजनंतर तब्बल 3 वर्षांनी ह्रतिक दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. 

ह्रतिकच्या वाढदिवसानिमित्त आगामी बहुचर्चित सिनेमा विक्रम वेधामधून त्याचा जबरदस्त लुक उलगडण्यात आला आहे. त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची बरीच उत्सुकता होती. अखेर या लुकमुळे वाढदिवशी चाहत्यांनासुध्दा छान सरप्राईज मिळालं आहे. 

 

Recommended

Loading...
Share