दीप-वीरच्या लग्नातील पहिला फोटो पाहण्यासाठी आता फक्त काही तासांची प्रतिक्षा

By  
on  

फक्त बॉलिवूड आणि चाहतेच नाही तर अवघ्या जगाला आता दीप-वीरच्या लग्नातले ते सुरेख आणि अविस्मरणीय क्षण पाहण्याची घाई झाली आहे. कधी एकदा त्यांचे ते गोड फोटो पाहून समाधान होतंय असं तुमच्या-आमच्या पैकी प्रत्येकाला झाला असेल ना.

दीप-वीर 14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले तर आज 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी हे बॉलिवूड कपल सिंधी पध्दतीने विवाह करतील. पण अजूनही त्यांचा लग्नातील एकही फोटो बाहेर प्रसिध्द झालेला नाही.

आपल्या लग्नातील क्षण आणि फोटो फक्त खासगी रहावेत यासाठी दीप-वीर यांच्या लग्नात खास सुरक्षा ठेवण्यात आली आहे. लग्नस्थळी जागोजागी जॅमर्स व ड्रोनवर बंदी घातल्यानंतर त्यांनी पाहुण्यांच्या मोबाईल फोनवरसुध्दा स्टिकर्स लावले. या एकूणच कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांचा एकही फोटो व्हायरल झाला नाही.

पण आता सूत्रांच्या माहितीनुसार, आज सिंधी पध्दतीने विवाह संपन्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नातील फोटो शेअर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे या नवविवाहित दाम्पत्याला पाहण्यासाठी बॉलिवूडला व  चाहत्यांना आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Recommended

Share