'सेल्फी' चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

By  
on  

'सेल्फी' या आगामी चित्रपटातून एक हटके जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मा प्रोडक्शसंने दक्षिणेतील सुपरस्टार आणि निर्माते  पृथ्वीराज सुकुमारन आणि मॅजिक फ्रेम्स  या कथेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.  केप ऑफ गुड फिल्म्स सोबत ड्रामा-कॉमेडी चित्रपट 'सेल्फी' ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.  हा चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स' या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि इमरान यांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहता येईल. ड्रामा ने भरलेली ही एक अनोखी कथा असून प्रेक्षकांना वेगळ्या प्रवासात घेऊन जाईल. सोशल मिडीयावर सेल्फी काढतानाचे फोटो पोस्ट करून अक्षय आणि इमरानने या  चित्रपटाची घोषणा केली आहे.

 

एवढच नाही तर सेल्फी गाण्याची छोटीशी झलकही शेयर केली आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

स्वर्गीय अरुणा भाटिया, हिरू यश जोहर, सुप्रिया मेनन, करण जोहर, पृथ्वीराज सुकुमारन, अपूर्व मेहता आणि लिस्टिन स्टीफन निर्मित 'सेल्फी' हा चित्रपट याचवर्षी म्हणजे 2022 मध्ये सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share