'पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू, अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेचं केलं तोंडभरुन कौतुक

By  
on  

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या सिनेमांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याचा  ‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा हिंदी व्हर्जनने रसिकांचं लक्ष वेधलंय. यातील गाणी-डायलॉग सारंच सुपरहिट आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील नायकाला म्हणजेच अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला आपल्या मराठमोळ्या प्रसिध्द अभिनेत्याने आपला आवाज दिला आहे. तो म्हणजे प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदेने. 

पुष्पा सिनेमाच्या हिंदी व्हर्जनच्या यशात श्रेयसचासुध्दा खुप मोठा वाटा आहे. अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत आभार मानले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ स्वत: श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “श्रेयसजी चित्रपटासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार” असे अल्लू अर्जुन बोलताना दिसत आहे.

 

Recommended

Loading...
Share