गेल्या 13 वर्षांपासून प्रियंकाचा भावी पती निक जोनासला आहे हा आजार

By  
on  

दीप-वीर यांचं लग्न साता-समुद्रापार मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या लग्नबेडीत अडकण्याचे. पण याच दरम्यान निकने नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा करुन सर्वांना चकित करुन टाकलं आहे. निकने आपल्याला एक आजार असल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं.
निक जोनासने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. तो म्हणतो,"13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मला डायबिटीजचे निदान झाले होते. डॉक्टरकडे तपासण्यापूर्वीच माझं 100 पौंड वजन कमी झालं होतं पण नंतर मी योग्य खाणं-पिणं घेत डायबिटीजवर पूर्ण नियंत्रण ठेवलं. मी माझे चाहते आणि हितचिंतकांचा खुप खुप आभारी आहे. या पोस्टसोबत माझा पूर्वीचा व आत्ताचा स्वस्थ फोटो."

https://www.instagram.com/p/BqRT9rYl1Zt/

 

 

Recommended

Loading...
Share