
बॉलिवूडवर आपल्या सूरांनी मोहिनी घालणारा प्रसिध्द गायक शान मुखर्जी याच्या आईचं निधन झालं आहे. त्याची आई सोनाली मुखर्जी यासुध्दा गायिका होत्या. सर्वप्रथम गायक कैलाश खेर यांनी ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातम दिली. त्यानंतर गुरुवारी दुखात असलेल्या शानने आईच्या आठवणीत सोशल मिडीयावर पोस्ट केली. त्यामुळे सर्वांनी सोनाली मुखर्जी यांना श्रध्दाजली अर्पण करत शान यांचं सांत्वन केलं आहे.