By  
on  

OMG बाजारात विकला जातोय सैफ-करिनाचा लाडका ‘तैमूर बाहुला’!

आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा सेलिब्रिटी किड्सची जास्त चर्चा रंगते. आराध्या बच्चन, करणचे यश-जुही, सोहाची इनाया, शाहिद कपूरची मीशा या सध्याच्या स्टार किडमध्ये सर्वात जास्त क्यूटनेस ओव्हरलोडेड कोण असेल तर तुम्ही पट्कन सांगाल, सैफ अली खान आणि करिना कपूरचा लाडका तैमूरच सर्वांत जास्त पॉप्युलर आहे आणि त्याची ही प्रसिध्दी कोणापासूनच लपलेली नाही.

नेहमीच फोटो जर्नलिस्टच्या गराड्यात वावरणा-या तैमूरची प्रसिध्दी इतकी टोकाला गेलीय, की चक्क त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा खेळण्यातला बाहुला बाजारात विकायला ठेवण्यातला आला आहे. काय, तुम्हालासुध्दा ऐकून आश्चर्य वाटलं ना!  पण विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे, या बाहुल्याचं नाव तैमूरचं आहे. आता त्याच्या नावानेच खेळणी विकली जातायत म्हणजे त्याच्या प्रसिध्दीचा अंदाज आपण घेऊ शकतो.

https://www.instagram.com/p/Bo_EEJfnKKa/

महत्त्वाचं म्हणजे, 72 मैल एक प्रवास यांसारख्या मराठी सिनेमांची निर्मिती करणा-या अश्विनी यार्दी यांनी तैमूरच्या या बाहुल्याचं ट्विट करत केरळ येथील खेळण्यांच्या स्टोअर्समध्ये हा तैमूर बाहुला विक्रीला असल्याचं त्यांनी सांगितलंय.

https://twitter.com/AshviniYardi/status/1064533816436502535

तैमुरच्या एका फोटोसाठी फोटोग्राफर्स १५०० रुपये आकारतात असं खुद्द सैफ अली खानने सांगितलं आहे.सैफने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती.

आता मुलगा तैमूरचा हा बाहुला पाहून सैफ अली खान आणि पत्नी करिना कपूर खान काय प्रतिक्रिया देतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive