प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी चिमुकल्याचं आगमन

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने शुक्रवारी रात्री सोशल मिडीयावरुन एक आनंदाची बातमी शेयर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रियांका व तिचे पती प्रसिध्द हॉलिवूड सिंगर निक जोनास यांनी सरोगसीद्वारे एका बाळाला जन्म दिला आहे.  प्रियंका आणि निकचे हे पहिलेच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. आता प्रियांका आणि निकवर जगभरातील चाहते आणि सेलिब्रिटी वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

“आम्ही सरोगसीच्याद्वारे आमच्या बाळाचे स्वागत केले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या या खास कौटुंबिक क्षणांमध्ये आम्हाला एकांत मिळेल अशी आम्ही तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो." अशा आशयाची पोस्ट प्रियांका व निक दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवरुन केली आहे. 

 

Recommended

Loading...
Share