प्रियंकाच्या लग्नाचे पूर्वसोहळे आणि दीप-वीरचं रिसेप्शन एकाच दिवशी? निमंत्रण पत्रिका आली समोर

By  
on  

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांचे कौतुक सोहळे थाबांयचं काही नाव घेत नाही. आता बंगळूर येथील लग्नाचे रिसेप्शन आटोपल्यानंतर रणवीरच्या बहिणीने त्याच्यांसाठी मुंबईतसुध्दा एका खास रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यातच आता आणखी एक रिसेप्शन म्हणजे खुद्द दीप-वीरनेच आपल्या बॉलिवूडमध्यल्या संपूर्ण मित्रपरिवारासाठी मुंबईत आयोजित केली आहे.

दीपवीरच्या या लग्नाच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका आता सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागली आहे. येत्या 1 डिसेंबरला शनिवारी मुंबईतील ग्रॅंड ह्यात हॉटेलमध्ये रात्री 9 वाजल्यापासून सुरु होत आहे. या रिसेप्शनचा ड्रेस कोड ब्लॅक टाय असा ठेवण्यात आला आहे.

https://twitter.com/mkoirala/status/1065086972350341121

दरम्यान महत्त्वाचं म्हणजे, देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिच्या लग्नाचे खास पूर्वसोहळेसुध्दा याच दिवशी असल्याने याबाबत एकच चर्चेला उधाण आलं आहे.

https://youtu.be/POqfE-AT1Ys

Recommended

Loading...
Share