By  
on  

रेणुका शहाणेंच्या ‘त्रिभंगा’मध्ये झळकणार का या तिघी?

हिंदीत आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडणारी उत्साही अभिनेत्री  म्हणून ओळखली जाणारी रेणुका शहाणे हिने नऊ वर्षांपूर्वी रीटा या मराठी सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता लवकरच रेणुका शहाणे आपल्या बॉलिवूड दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे. रेणुका सध्या आपल्या सिनेमाची जोरदार तयारी करत असून पुढील वर्षी म्हणजेच २०१९ च्या मध्यापर्यंत तिचा ‘त्रिभंगा’ हा सिनेमा फ्लोअरवर जाणार असल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार रेणुका शहाणे आपल्या सिनेमासाठी अनेक अभिनेत्रींशी चर्चा करत असून हा एक फॅमिली ड्रामा आहे आणि यातील स्त्री पात्रांच्या प्रमुख भूमिकेसाठी सशक्त अभिनेत्रींच्या शोधात आहे. ती यासाठी बरीच चर्चा करतेय. शबाना आझमी, काजोल आणि मिथीला पालकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. रेणुका यांनी नुकतीच शबाना आणि काजोल यांची भेटसुद्धा घेतली आहे.

शबाना आजमी म्हणजे जणू अभिनयाचं चालतं-बोलतं विद्यापीठचं तर काजोल म्हणजे आपल्या भूमिकेला योग्य न्याय देणारी अभिनेत्री. मिथीला पालकरबद्दल बोलायचं झालं तर वयाने लहान असली तरी वेबसिरीज असो किंवा हिंदी-मराठी सिनेमा आता सर्वच फ्लॅटफॉर्मवर ती आपल्या अभिनयाने सर्वांवर जादू करतेय.

तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित या चित्रपटाची कथा असून सिद्धार्थ मल्होत्रा याची निर्मिती करण्यात असल्याचं समजतंय. सिद्धार्थ मल्होत्रा यांनी याआधी राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या तीन पिढ्यांच्या महिलांची कथा ‘त्रिभंगा’ यामध्ये दाखवण्यात येणार असल्याचं रेणुका यांनी सांगितलं.

Recommended

PeepingMoon Exclusive